You are currently viewing प्रवास महाग झाला !जी.एस.टी लागला!

प्रवास महाग झाला !जी.एस.टी लागला!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*प्रवास महाग झाला !जी.एस.टी लागला!*

साधासुध्या माणसाचा तसा
कोणताच ब्रॅण्ड नसतो
आजूबाजूची गर्दी वाढताचं
ओळखचं स्वतःची विसरतो..

सामान्याचा जगण्याचा प्रवास
तसा बिकटचं राहतो
गरीब माणसाकरता प्रवास
अधिकचं वेदनेचा असतो..

श्वास मृत्युच्या प्रवासात
प्रचंड भोगावं लागतं
नशीबाचा हवाला देत
चितेवर लोळवलं जात..

मृत्युते- चिता हल्ली
प्रवास महाग झाला
अंत्यसंस्काराच्या सामानावर आता
जी.एस.टी अठराटक्के लागला..

जी.एस.टी भरूनच आता
सरणावर जाता येईल
मरणचं महाग झालंतरं
ढगांत कसा जाईल..

सरणावर कळत सामान्याला
जगणं-मरणात स्वस्त कोणतं
तेव्हाचं खरंखुरं अर्थशास्त्र
प्रवासात कळायला लागतं..

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा