*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*श्रीरंग*
राधिका संगे कृष्ण रंगात रंगला श्रीरंग
करतले धरून अलगुज, राधेचे
पाही अंतरंग
कृष्णबावर्या राधेच्या मुखकमली
खुले प्रीतरंग
राधेच्या मोहक लाडक्या रुपावर
भुलले श्रीरंग
सुवर्णालंकारे आभुषिराधाकृष्णाचे
सौंदर्य रंग
खुलति दिव्य प्रेमप्रतीक भावनाचे
रसिक रंग
सुंदर वसनांने रंगीत, खुलवित नवे
मनोहर तरंग
रत्नजडित़आभुषणे खुलविसौंदर्य
साजिरे रुपरंग
मुखकमलावर उभयतांच्या विलसे
प्रेमप्रतीक रंग
राधाकृष्णाच्या प्रेमभावना विश्वास
भारुनि प्रेम रंग
हेचि प्रतीक प्रेमाचे अजरामर होई
व्यापी विश्वरंग।
चित्र । मयुरी
काव्य स्वप्नगंधा