You are currently viewing ऍमेझॉनचे (amezon)संस्थापक जेफ बेझोस यांनी मनसेच्या इमेलची घेतली दखल

ऍमेझॉनचे (amezon)संस्थापक जेफ बेझोस यांनी मनसेच्या इमेलची घेतली दखल

मुंबई :

ऑनलाइन शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेले ऍमेझॉन ऍप आता मनसेच्या इशा-यापुढे नमले आहे. कारण ऍमेझॉन ऍपमध्ये मराठी भाषेचा समावेश केला जाणार आहे. ऍमेझॉन ही ऑनलाइन शॉपिंगसाठीची एक महत्त्वाची ई कॉमर्स कंपनी आहे. ऍमेझॉन ऍपने मराठी भाषेचा समावेश केला आहे. मनसेने ऍमेझॉनला खळ्ळ खटॅकचा इशारा दिल्यानंतर ऍमेझॉन इंडियाने नमते घेतले आहे. यूएसचे प्रतिनिधी आणि मनसे चिटणीस अखिल चित्रे यांच्यात बीकेसी कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्स माध्यमातून बैठक झाली. त्यानंतर ऍमेझॉनने मराठी भाषेचा ऍमेझॉन ऍपमध्ये समावेश करण्यास संमती दिली आहे. ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी मनसेच्या इमेलची दखल घेतली आहे. ऍमेझॉन ऍपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यासाठी २० दिवस लागणार आहेत.

मराठी भाषेचा ऍमेझॉन ऍपमध्ये समावेश करण्याबाबत मनसे नेते अखिल चित्रे यांनी पाठवलेल्या इमेलला कंपनीने उत्तर दिले होते़ त्यानंतर एक बैठकीही झाल्या. या ईमेलचा स्क्रिन शॉट अखिल चित्रे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. जेफ बेझोस आपला इमेल मिळाला आहे, ऍमेझॉन ऍपबाबत तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित टीमला याची माहिती दिली आहे असे ऍमेझॉनच्या वतीने कार्तिक यांनी लिहिले आहे. ऍमेझॉन डिजिटल सेवेत मराठी भाषेला प्राधान्य द्या या मनसेच्या आग्रही मागणीची ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनीही दखल घेतली आहे. राजसाहेब म्हणतात तसे तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम असाल तर जग तुमची दखल घेते, असे वाक्य अखिल चित्रे यांनी त्यांच्या ट्विटरवर पोस्ट केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा