You are currently viewing वैभववाडी भाजपा पदाधिकारी दिल्लीत : केंद्रीय उद्योगमंत्री नारायणराव राणे यांचे केले अभिनंदन

वैभववाडी भाजपा पदाधिकारी दिल्लीत : केंद्रीय उद्योगमंत्री नारायणराव राणे यांचे केले अभिनंदन

वैभववाडी

वैभववाडी भाजपा पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री  नारायणराव राणे यांची दिल्ली येथे भेट घेतली. व त्यांना शुभेच्छा दिल्या. कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची केंद्रीय उद्योगमंत्री पदी निवड झाल्यानंतर वैभववाडी तालुक्यात भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिवाळी साजरी करत जल्लोष केला होता.

रविवारी तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नारायण राणे यांचे अभिनंदन करण्यासाठी थेट दिल्ली गाठली. यामध्ये भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, उपसभापती अरविंद रावराणे, जि. प. सदस्य सुधीर नकाशे, माजी नगरसेवक संताजी रावराणे, भाजपा पदाधिकारी सुनील भोगले यांचा समावेश होता. यावेळी तालुक्यातील प्रलंबित प्रकल्प मार्गी लावणे, या विषयी चर्चा करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − twelve =