You are currently viewing शौर्यगाथा

शौर्यगाथा

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना

*शौर्यगाथा..*

अखंड भारत हिंमतीचा हा स्मरु शौर्यगाथा
उन्नत आहे, उन्नत राहील सदैव हा माथा..

हितशत्रू ना आम्ही कुणाचे खंजीर खुपसाया
आम्हास कळते देशावरती करु फक्त माया
उज्वल आमुची परंपरा हो सिंधूपारसाता..
अखंड भारत हिंमतीचा हा…

पराक्रमी हो वीर किती ते गाजविले रण
बाजी जीवाची लावून गेले निभावला प्रण
तोंडाच्या ना दवडी वाफा,भारत हा त्राता..
अखंड भारत हिंमतीचा हा…

धावूनी जातो देतो जीवाला जीव असे ख्याती
इमान आहे धरतीशी हो पावन ही माती
चंदनबुक्का माथी लावतो मारत नाही बाता..
अखंड भारत हिंमतीचा हा …

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा