You are currently viewing शिक्षक

शिक्षक

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी प्रवीण खोलंबे लिखित अप्रतिम काव्यरचना*

*शिक्षक*

शिक्षक असतो विद्यार्थी घडवणारा मुर्तीकार |
संस्कार शिल्प कोरणारा जीवनाचा शिल्पकार||

शिक्षक असतो समाजाचा आरसा |
बोलणं कुणाचं न घेई लावुन फारसा ||

अज्ञानी मुलास ज्ञानी बनवतो |
बरे वाईट गुण फरक शिकवतो ||

विद्यार्थी मधील दुर्गुण काढी बाजुला |
सद्गुणांची पेरण करी दाही दिशेला ||

उत्तम खेळाडू, उत्तम प्रशिक्षक बनवी |
उत्तम वक्ता , उत्तम वैज्ञानिक घडवी ||

कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रात मार्गदर्शक |
सुसंस्कृत पिढी घडवणारा असतो शिक्षक ||

अखंड शिक्षणाचे कार्य करीतो महान |
ज्ञानामृताने भागवी विद्यार्थींची तहान ||

तन,मन,धनाने अर्पण करी आपलं आयुष्य |
ज्ञान देवुनी घडवितो एका पिढीचं रं भविष्य ||

कवी प्रविण खोलंबे.
ता.मुरबाड ,जि.ठाणे.
संपर्क – ८३२९१६४९६१
______________________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा