*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम बालगीत*
*चांदोमामा चांदोमामा*
चांदोमामा चांदोमामा खूप झाल्या तुझ्या लीला
आता तरी ये ना तू माझ्या सोबत खेळायला ||धृ||
दिवसा कुठे राहतो रात्रीच का रे दिसतो
अशी का रे तू रोज रोज लपाछपी खेळतो
मला प्रश्न पडला ढगाआड का रे तू लपला
आता तरी ये ना तू माझ्या सोबत खेळायला ||१||
सांग कुठे बांधला तू सुंदर चंदेरी बंगला
बांधला तर बांधला आकाशात का टांगला
कसं येऊ मी सांग तुझ्या बंगल्यात राहायला
आता तरी ये ना तू माझ्या सोबत खेळायला ||२||
कधी येईल माझ्याघरी खरं सांग ना मला
आईने केले गोड लाडू त्यातले देईन तुला
खेळणी खूप माझ्याकडे खेळ सारे खेळायला
आता तरी ये ना तू माझ्या सोबत खेळायला ||३||
मी कसे हसू सांग माझ्यावर का तू रुसला
तुझ्यासाठी आणला मी चॉकलेटचा बंगला
तुझ्या बंगल्यात एक खोली मिळेल का मला
आता तरी ये ना तू माझ्या सोबत खेळायला ||४||
कवी:-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर,धुळे.*
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७७.
