You are currently viewing दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा ‘संगीत नाट्य महोत्सव २०२३

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा ‘संगीत नाट्य महोत्सव २०२३

*दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा ‘संगीत नाट्य महोत्सव २०२३’*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने २८ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत संगीत नाट्य महोत्सव आयोजित केला असून नाट्यरसिकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. दररोज संध्याकाळी ५.३० वाजता त्याचे आय़ोजन संस्थेच्या वा. वा. गोखले (वातानुकूलित) सभागृहात होणार आहे.

गोविंद बल्लाळ देवल लिखित संगीत शारदा हे संगीत नाटक शुक्रवार दिनांक २८ एप्रिल २०२३ रोजी सादर होईल. पुणे येथील भरत नाट्य संशोधन मंदिर ही नाट्यसंस्था त्याचे सादरीकरण करेल. शनिवार दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजी कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित आणि संगीत दिग्दर्शक कै. भास्करबुवा बखले यांचे संगीत स्वयंवर हे संगीत नाटक पुणे येथील कलाद्वयी ही संस्था सादर करेल. रविवार दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी विद्याधर गोखले लिखित संगीत मदनाची मंजिरी हे नाटक पुणे येथील कलाद्वयी संस्थेचे कलाकार सादर करणार असून त्याचे संगीत दिग्दर्शन प्रभाकर भालेकर आणि संगीतभूषण पं. राम मराठे यांनी केले आहे.

अधिकाधिक रसिकांनी या नाट्य महोत्सवातील संगीत नाटकांचा आनंद घ्यावा, असे आवाहन दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्यी वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – ०२२-२४३०४१५०.

प्रतिक्रिया व्यक्त करा