You are currently viewing निरवडे बाईतवाडी येथील सचिन बाईत या युवकाचे निधन

निरवडे बाईतवाडी येथील सचिन बाईत या युवकाचे निधन

सावंतवाडी

निरवडे येथील रामचंद्र ऊर्फ सचिन दशरथ बाईत (३८, बाईतवाडी ) या युवकाचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस त्याच्यावर ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रविवारी पहाटे ३.३० च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

मुंबई येथील एका खाजगी कंपनीत चांगल्या हुद्द्यावर तो नोकरीला होता. कोरोना काळात काही महिन्यांपूर्वी तो घरी परतला होता. त्यातच त्याचे दुर्दैवी निधन झाले. त्याच्या पश्चात आई, पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे. त्याच्या आकस्मिक निधनामुळे निरवडे परिसरावर शोककळा पसरली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा