You are currently viewing कणकवली- शिरगाव एसटी बस पुलाच्या भरावात कलंडली

कणकवली- शिरगाव एसटी बस पुलाच्या भरावात कलंडली

कणकवली- शिरगाव एसटी बस पुलाच्या भरावात कलंडली

कणकवली येथून सकाळी ७ वाजता सुटणारी कणकवली शिरगाव ही एस टी बस कुुवळे परबवाडी येथील काजराचा व्हाळ येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या भरावात कलंडल्याने अपघात होता होता वाचला. ही घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडला.
या फुलाचे काम फेब्रुवारी महिन्या पासून सुरू असून सध्या दोन्ही बाजूच्या भरावाचे काम सुरू आहेत या भरावात पाणी मारून रोलर फिरवीत नसून मातीचाच भराव करत आहेत. त्यामुळे या मातीच्या भरावात एसटी बसचे चाक मातीत रुतून बस कलंडली माञ चालकाच्या प्रसंगावधाने मोठा अनर्थ टळला.या बसमधून १२ प्रवासी प्रवास करत होते.
यावेळी कुवळे गावचे सरपंच सुभाष कदम यांनी या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली.ठेकेदाराच्या कामातील दिरंगाई, हलगर्जीपणामुळे हा प्रसंग घडला असे त्यानी सांगितले.यावेळी कुवळे ग्रामपंचायत सदस्य सुभाष थोरबोले,रत्नदीप कुवळेकर, भाजपा बुथ अध्यक्ष अजित घाडी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.यानी वाहतूक पुर्ववत होण्यासाठी सहकार्य केले.
हि एस.टी. रस्त्यावर मध्येच अडकल्याने या मार्गावरील वाहतूक ४ तास ठप्प होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा