You are currently viewing मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ घेण्यासाठी MahaDBT 2.0 पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करा

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ घेण्यासाठी MahaDBT 2.0 पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करा

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ घेण्यासाठी MahaDBT 2.0 पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करा

जिल्ह्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यावसायिकांना आवाहन

सिंधुदुर्ग

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते दि. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या ऑनलाईन पोर्टलचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर ही योजना राज्यात कार्यान्वित झाली आहे.

            या योजनेंतर्गत विविध घटकांचा लाभ घेण्यासाठी MahaDBT 2.0 पोर्टल सुरू करण्यात आले असून, इच्छुक लाभार्थ्यांना https://mahadbt2.maharashtra.gov.in/scheme-apply या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत.

            तरी जिल्ह्यातील सर्व मच्छिमार, मत्स्यसंवर्धक, मत्स्यकास्तकार तसेच मत्स्यव्यवसायाशी निगडित इतर घटकांनी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ घेण्यासाठी MahaDBT 2.0 पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त सा.वि. कुवेसकर यांनी केले आहे.

 

अधिक माहितीसाठी संपर्क :

सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग
साईछाया, सेवांगण रोड, धुरीवाडा, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग.
प्रतिक महाडवाला – दूरध्वनी : ०२३६५-२५२००७

सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, वेंगुर्ला
रामेश्वर मंदिराजवळ, वेंगुर्ला मार्केट, वेंगुर्ला.
गणेश टेमकर – मो. ९४०८२८५४७३

सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, देवगड
दुसरा मजला, हॉटेल डायमंड, सातपायरी, देवगड.

 किरण वाघमारे – मो. ९८८१६००९५१

प्रतिक्रिया व्यक्त करा