You are currently viewing कुडाळदेशकर बांधवांसाठी कुडाळात उद्यापासून ”स्नेहबंध क्रीडा चषक”

कुडाळदेशकर बांधवांसाठी कुडाळात उद्यापासून ”स्नेहबंध क्रीडा चषक”

कुडाळदेशकर बांधवांसाठी कुडाळात उद्यापासून ”स्नेहबंध क्रीडा चषक”

कुडाळ

कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या वतीने १३ व १४ जानेवारीला कुडाळ येथे स्नेहबंध २०२४ या क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळदेशकर ज्ञाती बांधवांसाठी मर्यादित क्रिकेट सामने लीग पद्धतीने कुडाळ एमआयडीसी येथे फायर ब्रिगेड समोरील मैदानावर खेळविले जाणार आहेत. या स्पर्धांचे उद्घाटन प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक शेखर उर्फ पप्पू नाईक व सावंतवाडी येथील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ. शंतनू तेंडुलकर यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता करण्यात येणार आहे.
या क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील खेळाडूंचा समावेश असणार आहे. यावर्षीपासून या स्पर्धा लीग पद्धतीने खेळविल्या जाणार असून, विजेत्या व उपविजेत्या संघांना ”स्नेहबंध क्रीडा चषक” प्रदान करण्यात येणार आहे. तसेच रविवारी (ता. १४) सायंकाळी ६.३० वाजता कुडाळ एमआयडीसी येथील बॅ. नाथ पै शैक्षणिक संकुलामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन परुळे येथील ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. उमाकांत सामंत यांच्या हस्ते होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्ञाती बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष रणजित देसाई, सचिव प्रशांत धोंड व कार्यकारिणीने केले आहे.

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर *

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा