*ज्ञान , विचार, संस्कृतीचा ठेवा म्हणजे दिवाळी अंक _साहित्यिका प्रा. प्रतिभा सराफ
मुंबई _
ज्ञान, विचार, संस्कृतीचा ठेवा म्हणजे दिवाळी अंक असून ते एखाद्या दिव्यासारखे आहेत असे साहित्यिका प्रा. प्रतिमा सराफ यांनी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, दादर स्वायत्त विभाग आणि दर्याचा राजा साहित्यिक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “दर्याचा राजा ‘२०२६च्या व्या दिवाळी १९ व्या अंकाच्या प्रकाशन करताना नमूद केले.”दर्याचा राजाचे’ संपादक पंढरीनाथ तामोरे, कार्यकारी संपादक जनार्दन पाटील, सहसंपादक प्रमोद कांदळगावकर, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे कार्यवाह श्री भरत राऊत, कवी कमलाकर राऊत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दादर येथे दिनांक ८ नोव्हेंबर रोजी उत्साहात संपन्न झाले.
याप्रसंगी जेष्ठ पत्रकार श्रीकांत आंब्रे, कवी वसंत तांडेल, भालचंद्र मेहेर, राजेंद्र मेहेर, पत्रकार जगन्नाथ पाटील यांनी आपली मनोगत व्यक्त केली.
पुढे जाऊन प्रा.प्रतिभा सराफ म्हणाल्या की,
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुस्तकाच्या प्रांगणात दर्याचा राजा दिवाळी अंकाचे प्रकाशन माझ्या हस्ते होते आहे याचा मला आनंद होतोय याबद्दल साहित्यिक पंढरीनाथ तामोरे यांचे प्रथम अभिनंदन करते खरंतर ग्रंथालय ही पवित्र वास्तू आहे. आजही शंभर वर्षांपूर्वीचे अंक उपलब्ध आहेत. दरम्यान ग्रंथालयातील सेवकांना पुरेसे मानधन मिळणे गरजेचे आहे. दर्याचा राजा हा अंक कोळी बांधवांसाठी पर्वणी आहे. श्री. तामोरे यांनी माणसे जोडण्याचे काम केले आहे.
सध्याच्या परिस्थितीत दिवाळी अंक काढणे सोपे राहिलेले नसून त्याहीपेक्षा स्पर्धेत टिकून राहणे ही तर सोपी बाब नव्हे, असे प्रा.प्रतिभा सराफ यांनी सूचित केले.
प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन सहसंपादक प्रमोद कांदळगावकर यांनी मौलिक शब्दात केले, याप्रसंगी कवी, लेखक, पत्रकार यांची उल्लेखनीय उपस्थिती होती.
