You are currently viewing प्रा. डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांची आत्महत्या

प्रा. डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांची आत्महत्या

शैक्षणिक क्षेत्राला हादरवणारी घटना..

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. ज्योत्स्ना मेश्राम (५६ मूळ रा. अष्टविनायकनगर ,जयताळा) यांनी इमारतीच्या नवव्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना आज पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास बेलतरोडीतील फॉर्च्युन श्री अपार्टमेंट येथे घडली. त्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र जळगाव विद्यापीठाचे माजी कुलगुरू दिवंगत डॉ. सुधीर मेश्राम यांच्या पत्नी होत. दरम्यान, पती सुधीर मेश्राम यांच्या निधनानंतर त्या तणावात होत्या. त्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

माहितीनुसार, ज्योत्स्ना मेश्राम यांचा मुलगा अमेरिकेत वास्तव्यास आहे. आठ दिवसांपूर्वीच त्या अमेरिकेहून परतल्या होत्या. त्या फॉर्च्युन अपार्टमेंटच्या नवव्या माळ्यावरील फ्लॅट क्रमांक ९०४ येथील मावशीकडे राहायला आल्या होत्या. सोमवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास त्यांनी नवव्या मजल्यावरील स्वयंपाकघराच्या गॅलरीतून उडी घेतली. त्यात गंभीररित्या जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. सुरक्षा रक्षकाला आवाज आला. त्याने बघितले असता मेश्राम या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्याने मेश्राम यांच्या नातेवाइकांना माहिती दिली. नातेवाइकांनी बेलतरोडी पोलिसांना कळविले. माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह उत्तररीय तपासणीसाठी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + eighteen =