You are currently viewing बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरून थेट खाली कोसळल्यामुळे सावंतवाडीत महिला जागीच ठार

बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरून थेट खाली कोसळल्यामुळे सावंतवाडीत महिला जागीच ठार

बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरून थेट खाली कोसळल्यामुळे सावंतवाडीत महिला जागीच ठार

सावंतवाडी

बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरून थेट खाली कोसळल्यामुळे सावंतवाडीत महिला जागीच ठार झाली. ही घटना आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास जिमखाना मैदानासमोर असलेल्या हरिहरेश्वर कॉम्प्लेक्स मध्ये घडली. अंजली वामन चव्हाण (वय ५५) असे तिचे नाव आहे. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला, असा अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित महिला ही हरिहरेश्वर कॉम्प्लेक्स मध्ये राहत होती. दरम्यान तिचे १५ दिवसांपूर्वी डोळ्याचे ऑपरेशन झाले होते. त्यामुळे तिला नीटसे दिसत नव्हते. आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ती बाहेर वाळत घातलेले टॉवेल काढत असताना तिचा अचानक तोल गेला व ती दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळली. यावेळी १०८ रुग्णवाहिकेच्या सहाय्याने तिला ,सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तत्पूर्वीच तिचे निधन झाले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तिचे १५ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. परंतु त्यानंतर ती आपल्या भावांच्या घरी राहत होती. रेल्वेचे अधिकारी दिनेश चव्हाण आणि बांधकाम विभागाचे अधिकारी राजन चव्हाण यांची ती बहिण होत. येथील कुटीर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा