You are currently viewing आझाद ग्रुपची सामाजिक उपक्रमांनी पैगंबर जयंती साजरी

आझाद ग्रुपची सामाजिक उपक्रमांनी पैगंबर जयंती साजरी

रक्तदान , आरोग्य तपासणी शिबीरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कबनूर येथे आझाद ग्रुपच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांनी पैगंबर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान, आरोग्य तपासणी व डोळे तपासणी शिबीरास नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी जेष्ठ नेते सुधाकर मणेरे , राहुल खंजिरे ,कैश बागवान यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

कबनूर येथील आझाद ग्रुपच्या वतीने विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम सातत्याने राबवण्यात येतात.विशेष म्हणजे नैसर्गिक व मानवनिर्मित संकटकाळात समाजातील गरीब, गरजूंना विविध स्वरुपात मदतीचा हात दिला जातो.नुकताच पैगंबर जयंती निमित्त रक्तदान , आरोग्य तपासणी व डोळे तपासणी शिबिर अशा विविध सामाजिक उपक्रमांनी पैगंबर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी जेष्ठ नेते सुधाकर मणेरे , इचलकरंजी इंडस्ट्रीयल इस्टेटचे चेअरमन राहुल खंजिरे ,कैश बागवान, मिलिंद कोले ,
आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कमालभाई मुजावर
यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मान्यवरांनी आझाद ग्रुपच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक करत सर्वांनी हा आदर्श घेऊन विधायक कार्य करुन सामाजिक बांधिलकी जोपासावी ,असे आवाहन केले.
यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान, आरोग्य तपासणी व डोळे तपासणी शिबीरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या कार्यक्रमास अजीज खान ,अस्लम मुजावर , युनूस खान,राज असगर, आझाद ग्रुपचे मुज्जमिल मुजावर,इम्रान पटाईत ,अबुबकर कुरणे , जुबेर मुल्ला , सलमान मुल्ला, महंमद पानारी ,असद सुतार, सोहेल नाईकवाडी, इम्तियाज म्हैशाळे यांच्यासह मुस्लिम समाज बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा