You are currently viewing ग्रेट भेट…

ग्रेट भेट…

कला आंगण म्युझियम व आर्ट गॅलरीला सौ. पल्लवी कौस्तुभ आमटे आनंदवन नागपूर यांची भेट

कुडाळ :

आज कला आंगण म्युझियम व आर्ट गॅलरीला मा. सौ पल्लवी कौस्तुभ आमटे आनंदवन नागपूर यांनी भेट दिली. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील आदिवासी ठाकर समाजाच्या लोककलांची माहिती जाणुन घेतली. संग्रहालयात सादर केल्या जाणा-या लोककलांचे सादरीकरण बघितले. यावेळी त्यांनी भारत सरकारने सन 2021 चा पद्मश्री पुरस्कार संस्थापक अध्यक्ष श्री. परशुराम गंगावणे यांना दिल्याबाबत त्यांची ही सदिच्छा भेट घेतली. सौ. पल्लवी आमटे यांनी आनंदवन नागपुर येथील प्रकल्पाची माहिती दिली. तसेच पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी आदिवासी ठाकर समाजाचि लोककला व संस्कृती बाबत माहिती दिली. यावेळी त्यांचे सोबत प्राची माहुरकर, माधुरी कानेटकर, प्रद्युम्न सहस्त्रभोजने, कविता भालेराव तसेच कॉनबॅक चे मोहन होडावडेकर सर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा