You are currently viewing कणकवली सिद्धार्थनगर कणकवली नगरपंचायत कणकवली यांच्या मार्फत बांधण्यात आलेल्या अंगणवाडीचे उद्घाटन

कणकवली सिद्धार्थनगर कणकवली नगरपंचायत कणकवली यांच्या मार्फत बांधण्यात आलेल्या अंगणवाडीचे उद्घाटन

नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या हस्ते उद्घाटन

कणकवली

कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष गणेश ऊर्फ बंडू हर्णे यांच्या हस्ते करण्यात आले.त्या प्रसंगी वाडीतील रहिवाशी सुनील हिंदळेकर व सिकंदर जाधव यांनी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे स्वागत केले. प्रतीक्षा कांबळे यांनी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचे स्वागत केले. अंगणवाडी सेविका सुर्वे बाई यांचे स्वागत देखील करण्यात आले. अंगणवाडी चे सर्व विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते.

माजी नगरसेवक गौतम खुडकर, आनंद जाधव, विश्वास कांबळे, महेंद्र जाधव, संदीप कांबळे, सतीश कांबळे, माजी नगरसेविका विशाखा कांबळे, नगरसेविका उर्मी जाधव व अंगणवाडी साठी ज्यांनी जमीन दिली जमीन मालक सिकंदर जाधव व त्यांच्या मातोश्री व वाडीतील सर्व रहिवाशी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + 19 =