You are currently viewing सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत होण्यासाठीच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद…

सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत होण्यासाठीच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद…

सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत होण्यासाठीच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद…

मुख्यालय पत्रकार संघाने छेडले धरणे आंदोलन

सिंधुदुर्गनगरी नगर पंचायत व्हावी, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाने बुधवारी छेडलेल्या एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलनाला मोठा प्रतिसाद लाभला. ओरोस, रानबांबुळी आणि अणाव या तिन्ही गावातील सरपंच, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित राहत पाठिंबा दर्शविला. तसेच भाजप, शिंदे शिवसेना, ठाकरे शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस आणि अजित पवार राष्ट्रवादी, शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या पदाधिकारी यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. यावेळी जिल्ह्याची राजधानी सिंधुदुर्गनगरी नगर पंचायत झाल्याशिवाय गप्प बसायचे नाही, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना निवेदन देवून आंदोलन समाप्त करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडण्यात आलेल्या या आंदोलनाला संघाचे अध्यक्ष संदीप गावडे, नंदकुमार आयरे, विनोद दळवी, सचिव लवू म्हाडेश्र्वर, गिरीश परब, विनोद परब, जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपकर, गणेश जेठे, दत्तप्रसाद वालावलकर, संजय वालावलकर, मनोज वारंग, सतीश हरमलकर, तेजस्वी काळसेकर आदी पत्रकार संघ सभासद उपस्थित होते. यावेळी गुरुप्रसाद दळवी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, अजित पवार राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर, पत्रकार समिती जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर, ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर, शेखर सामंत, राजन चव्हाण, ओरोस सरपंच आशा मुरमुरे, माजी पंचायत समिती सदस्य सुप्रिया वालावलकर, भाई सावंत, उद्योजक संतोष कदम, रुपेश पावसकर, ओरोस उपसरपंच गौरव घाडीगावकर, दादा साईल, ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या जान्हवी सावंत, सुनील पाटकर, उल्हास मेस्त्री, सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण अध्यक्ष अशोक रासम, अशोक कदम, चंद्रकांत पाटकर, विशाल पारकर, अनिकेत तेंडोलकर, सुशील निंब्रे, अरविंद सावंत, डॉ अशोक महिंद्रे , मेघना उपानेकर, शंकर भोगले, चंद्रकांत सावंत, छोटू पारकर, योगेश तावडे, अमित भोगले, सुनील जाधव, विजय चव्हाण, बाळू कानडे, सुशील परब, प्रकाश जैतापकर, निलेश परब, माजी सरपंच आप्पा मांजरेकर, पी टी परब, माजी सभापती अंकुश जाधव, अणाव पोलीस पाटील सुनील पाटकर आदींनी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दर्शविला.

प्रतिक्रिया व्यक्त करा