You are currently viewing नाणोस, तिरोडा, गूळदुवे खरीचा स्टॉप भागात बिबट्या तसेच पटेरी वाघाचा मुक्त संचार

नाणोस, तिरोडा, गूळदुवे खरीचा स्टॉप भागात बिबट्या तसेच पटेरी वाघाचा मुक्त संचार

नाणोस, तिरोडा, गूळदुवे खरीचा स्टॉप भागात बिबट्या तसेच पटेरी वाघाचा मुक्त संचार

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; त्वरित बंदोबस्त करावा मनसेची वनविभागाकडे मागणी

सावंतवाडी

नाणोस, तिरोडा, गूळदुवे खरीचा स्टॉप या भागात बिबट्या तसेच पटेरी वाघाच्या सततच्यां वावरामुळे सध्या ग्रामस्थांमधून भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामस्थां बरोबरच विद्यार्थ्यांना देखील जीव मुठीत धरून या ठिकाणा हुन येजा करावी लागत आहे. या बिबट्या तसेच वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी तालुका सचिव मनोज कांबळी यांनी वनवीभागाकडे केली आहे.
नाणोस, तिरोडा, गूळदुवे खरीचा स्टॉप येथे गेल्या महिना भरात बिबट्या वं पटेरी वाघाचा वावर वाढला आहे. या गावांमध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांना दिवसा ढवळ्या दोन्ही प्राण्यांचे दर्शन होतं असल्यामुळे त्यां ठिकाणी भीतीचे वातावरण आहे. या तिन्ही गावामध्ये खाजगी वं वनविभागाचे सुरक्षित जगंल असून येथे बिबट्या वाघ वं पटेरी वाघाचा अधीवास आहे. याच जगंल भागात तिरोडा, नाणोस गूळदुवे ही गावे वसल्यामुळे ग्रामस्थांना याच परिसरातून ये जा करावी लागते. खरीचा स्टॉप या ठिकाणी अलीकडच्या काही दिवसांमध्ये खुले आम बिबट्या तसेच पटेरी वाघाचा मुक्त संचार असतो त्यामुळे हे दोन्ही प्राणी सरास ग्रामस्थांच्या निदर्शनास पडतात. सायंकाळच्यां वेळेस ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तीन दिवसापूर्वी बिबट्याने ग्रामस्थांचा पाठलाग केला होता. तर दुचाकीस्वरांना पहिल्यावर त्यांचा पाठलाग बिबट्याकडून केला जातं आहे. यामुळे दुचाकी चालकाचा अपघात देखील झाला आहे. शाळा महाविद्यालयात येणाऱ्या जाणाऱ्या मुलांना ग्रामस्थ, बाईकस्वार यांच्यामधून भीतीचे वातावरण पसरले आहे. या तिन्ही गावामध्ये बिबट्या वं पटेरी वाघाच्यां दहशतिने भीतीचे वातावरण पसरले आहे. लोक घरातून बाहेर पडण्यास घाबरत आहेत. वनवीभागाला वारंवार मागणी करून देखील याचा कोणताही बंदोबस्त करण्यात आलेला नाही. नाणोस येथे असलेल्या स्ट्रीट थोडक्या प्रमाणात चालू असून उर्वरित बंदच असल्याने काळोखात ग्रामस्थांना जीव मुठीत धरून जावे लागते. याबाबत वीज वितरण कंपनीचें लक्ष वेधूनही त्यांनी दखल घेतली नसल्यामुळे लवकरच याप्रशनी वीज कंपनीत धडक देणार असल्याचा ईशारा मनसे विद्यार्थी सेनेचे उपतालुकाध्यक्ष प्रणित तळकर यांनी दिला आहे. तर वारंवार सूचना करून देखील कोणतीही कार्यवाही न झाल्याने सावंतवाडी उपवनसंरक्षक कार्यालयात मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या मार्गदर्शनाखाली तिरोडा नाणोस गूळदुवे ग्रामस्थकडून घेराव घालण्यात येणार आहे असा ईशारा मनसे विद्यार्थी सेना तालुका सचिव मनोज कांबळी यांनी दिला आहे.

______________________________
*संवाद मिडिया*

*📢ऑफर..📢 ऑफर …📢ऑफर…📢*

*जे.पी.ची ‘लकी ऑफर’ !*

*🤩लकी ड्रॉ नाही तर चक्क आता *सर्वच ग्राहक होणार लकी…! 🤩*

*किंमत व सर्व्हिस याची खात्री करा, मगच खरेदी करा…!*

*🏮JP REFRIGERATION*

*ची MAHA INDIAN Diwali SALE💥🚀*

*♦️Up to 70% off on*

*🔖LED TV-AC-WASHING MACHINE – REFRIGERATOR HOME THEATER – INVERTOR – BATTERY-ATTA CHAKKI WATER PURIFIER – DEEP FREEZER – VISICOOLERS WATER HEATER – VACCUM CLEANER*

*🪔दिपावली विषेश सुट🪔*

*🎁प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट🎁*

*ऑफर 22nd Oct to 25th Nov पर्यंत*

*👉BAJAJ FINSERV AVAILABLE*

*🔹LED* सोबत *TATA PLAY* कनेक्शन मोफत*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113620/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा