You are currently viewing खा. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष

खा. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष

नवी दिल्ली:

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी खा. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची निवड करण्यात आली आहे. तर राष्ट्रीय सरचिटणीसपदी खा. सुनिल तटकरे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्ली येथील वर्धापन कार्यक्रमात शरद पवारांनी यांनी ही घोषणा केली.

शरद पवार यांनी 2 मे रोजी ‘लोक माझे सांगाती’ या आपल्या राजकीय आत्मकथेच्या विस्तारीत आवृत्तीच्या प्रकाशनावेळी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी 5 मे रोजी पत्रकार परिषद घेत आपण राजीनामा मागे घेणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर आज शरद पवार यांनी मोठी घोषणा केली. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्षपद देण्यात आले आहे. महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा या राज्यांची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड या राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 2 =