You are currently viewing कुडाळात शिवसैनिकांचा जल्लोष; फटाक्यांची आतिषबाजी..

कुडाळात शिवसैनिकांचा जल्लोष; फटाक्यांची आतिषबाजी..

कुडाळ :

 

आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी देऊन शिक्कामोर्तब केलंय. यामुळे राज्यात सर्वत्र शिवसैनिकांमध्ये उत्साह असून याचा आनंद साजरा करताना कुडाळ शिवसेना शाखा येथे फटाके लावण्यात आले. यावेळी ‘शिवसेना झिंदाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी कुडाळ तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

अतुल बंगे राजन नाईक, संतोष शिरसाठ, संजय भोगटे, कृष्णा तेली, किरण शिंदे, उदय मांजरेकर, जयभारत पालव, संदीप महाडेश्वर, राजू गवंडे, अमित राणे, बाळू पालव, समीर पालव, दीपक सावंत, बाळा पावसकर, नितीन सावंत आदी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × three =