कोविड लसीकरण कार्यक्रमाला सुसूत्रता येणं गरजेचं….

कोविड लसीकरण कार्यक्रमाला सुसूत्रता येणं गरजेचं….

नियोजनशून्य लसीकरण कार्यक्रमामुळे लसीकरण केंद्रच “कोरोना संक्रमण” केंद्र बनण्याची भीती

जिल्हाप्रशासनाने वेळीच दखल घेऊन आवश्यक उपाययोजना करावी…आशिष सुभेदार

देशासह राज्यात कोरोना संक्रमण प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे.त्या अनुषंगाने शासनाकडून कोविड लसीकरण करून घेण्यासाठी जनतेला विविध वृत्तपत्रे व मीडियामधून आवाहन करण्‍यात येत आहे. मात्र लसींचा अपुरा पुरवठा, दैनंदिन केंद्रांवर भासणार लसीचा तुटवडा व लसीकरण केंद्रावर जमणारी प्रचंड गर्दी पाहता लसीकरण कार्यक्रमात सुसूत्रता येऊन आरोग्य विभागाकडून नियोजनबद्ध कार्यक्रम आखणे गरजेचे आहे अशी मनसेची धारणा आहे. येत्या काळात 18 वर्षावरील सर्वांना लसीकरण करण्याचे सरकारने जाहीर केल्यामुळे यापुढे लसीकरण केंद्रांवर याहून अधिक गर्दी जमण्याची शक्यता असून परिणामी आरोग्य कर्मचाऱ्यांना देखील मनस्ताप सहन करावा लागणार आहे.त्यामुळे ग्रामपातळीवर आरोग्य उपकेंद्रात लसीकरणाची सुविधा निर्माण करून त्याचे नियोजन ग्राम सनियंत्रण समितीकडे द्यावे अशी आमची आग्रही मागणी आहे. “कोविड लसीकरण केंद्रे ही कोरोना संक्रमण केंद्रे बनू नयेत” यासाठी जिल्हा प्रशासनाने याची वेळीच दखल घेऊन नियोजनबद्ध लसीकरण कार्यक्रमातून त्यानुसार उपाययोजना करून कार्यक्रम राबवावा अशी मागणी मनसेच्या वतीने सावंतवाडी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा