You are currently viewing पेण मधील निंदनीय कृत्याचा श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थे कडून तीव्र निषेध !!

पेण मधील निंदनीय कृत्याचा श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थे कडून तीव्र निषेध !!

नराधमाला त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावे यासाठी संस्थेकडून उरणचे तहसीलदार व उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन !!!

उरण – रायगड जिल्हा:

दिनांक 30/12/2020 रोजी पहाटे 2:30 वाजता रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. एका नराधमाने एका अडीच वर्षाच्या आदिवासी समाजाच्या मुलीवर बलात्कार करून तिला ठार मारले. त्या नराधमाचे नाव आदेश मधुकर पाटील असे आहे. या आधी देखील या नालायकाने असे दोन वेळा प्रकार केल्याचे समजते. तो जामिनावर बाहेर आला होता आणि लगेच त्याने हे अमानवी, निंदनीय, अशोभनीय, माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केले. या वाईट प्रवृत्तीचा निषेध समाजातील सर्वच स्तरातील नागरिकांनी, विविध सामाजिक संस्थांनी केला.मात्र या घटनेचा कितीही निषेध केला तरी तो कमीच आहे. ही घटना ऐकताना किंवा समजून घेताना अंगावर काटे येतात व हे पाप करणाऱ्या प्रती अंगातील रक्त खळवळते. अश्या या अमानवी कृत्याचा निषेध करत मुख्य आरोपी आदेश मधुकर पाटील या नराधमास त्वरित फाशी देण्यात यावी अशी मागणी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था कोप्रोली-उरण या सामाजिक संस्थेने उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

पीडित मुलीला फास्टट्रॅक न्यायालयात लवकर न्याय मिळवून सदर व्यक्तीस फाशीची शिक्षा मिळावी यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थे तर्फे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष -विठ्ठल ममताबादे, सचिव -प्रेम म्हात्रे, सदस्य -सुरज पवार, आकाश पवार, सादिक शेख, हेमंत म्हात्रे, लखन करांडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व कार्याचा विविध सामाजिक कार्य व विविध उपक्रमातुन प्रसार व प्रचाराचे काम चालू आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र भूमीत असे निंदनीय अमानवी, पाशवी कृत्य होत असल्याने अश्या वाईट प्रवृत्तींना वेळीच आळा घातला पाहिजे म्हणून या विरोधात आम्ही आवाज उठविला असून या शिवछत्रपतींच्या राज्यात महिला भगिनींना सुरक्षित, आनंदाने जीवन जगता यावे यासाठी आम्ही सर्वजण या संस्थेच्या माध्यमातून कटिबद्ध आहोत.तरी लवकरात लवकर आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी. अश्या भावना संस्थेच्या माध्यमातून निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 4 =