You are currently viewing स्मृति भाग ६५

स्मृति भाग ६५

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग ६५*  

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

आज आपण *गौतम स्मृति* बद्दल विचार करु . गौतम ऋषिंनी लिहिलेल्या या स्मृतित एकूण एकोणतीस अध्याय आहेत . इतर बहुतांश स्मृति ह्या अनुष्टुभ छंदातील असल्याने गेयताही आहे ! पण ही स्मृति हे गद्य लेखन आहे . पाहू कोणत्या अध्यायात काय आहे ते !!

 

१) आचारवर्णनम् ।

२)ब्रह्मचारिधर्मवर्णनम् ।

३)ब्रह्मचारिप्रकरणवर्णनम् ।

४)विवाहप्रकरणवर्णनम् ।

५)गृहस्थाश्रमवर्णनम् ।

६)गृहस्थाश्रमकर्तव्यवर्णनम् ।

७)आपद्धर्मवर्णनम् ।

८)संस्कारवर्णनम् ।

९)कर्तव्याकर्तव्यवर्णनम् ।

१०)वर्णानां वृत्तिवर्णनम् ।

११)राजधर्मवर्णनम् ।

१२)विविधपापकरणे दण्डविधानवर्णनम् ।

१३)साक्षीणांविधानवर्णनम् ।

१४)अशौचवर्णनम् ।

१५)श्राद्धविवेकवर्णनम् ।

१६)अनध्यायवर्णनम् ।

१७)भक्ष्याभक्ष्यप्रकरणम् ।

१८)स्त्रीषु ऋतुकाले सहवासप्रकरणम् ।

१९)प्रतिषिद्धसेवने प्रायश्चित्तमीमांसाप्रकरणम् ।

२०)विविधपापानां कर्मविपाकवर्णनम् ।

२१)सर्वपातकेषु शान्तिप्रकरणम् ।

२२) निषिद्धकर्मणां जन्मान्तरे विपाकवर्णनम् ।

२३)प्रायश्चित्तवर्णनम् ।

२४)प्रायश्चित्तवर्णनम् ।

२५)रहस्यप्रायश्चित्तवर्णनम् ।

२६)प्रायश्चित्तवर्णनम् ।

२७)कृच्छ्रव्रतविधिवर्णनम् ।

२८)चान्द्रायणव्रतविधिवर्णनम् ।

२९)पुत्राणां सम्पत्तिविभागवर्णनम् ।

 

अशा पद्धतीने एकूण एकोणतीस अध्याय आहेत . यात प्रायश्चित्त व त्यासंबंधी उचलावयाची व्रते या संबंधाने जास्त अध्याय येतात . कारण सरळ आहे . पापेच जास्त होतात !!😂😂

तसे प्रत्येक ऋषिंनी स्वतःचे निरिक्षणाने , परिक्षणाने , मननाने , चिन्तनाने , वर्णन कौशल्याने , कर्मकौशल्याने वा वर्तन कौशल्याने येणार्‍या अनुभवाच्या कथन कुशलतेने , नजरेस पडणार्‍या प्रसंगांचे जाणीवांमधून काय शिकावे , कसे शिकावे , अंदाज कसे बांधावे , विचार कसे करावे , कसे वागावे , कसे बोलावे , इ. सर्व गोष्टींचा तयार खजिनाच भरुन ठेवलाय !! ज्याला जेवढे घेता येईल तेवढे घ्यावे !!

तशा सर्वच स्मृति वाचनीयच आहेत , चिंतनीय आहेत , मननीय आहेत आणि प्रवचनीय ही आहेत . वाचाल ना स्मृति ? 🙏🙏

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा