You are currently viewing याद येस रोज माले..

याद येस रोज माले..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अहिराणी बोलीतील अप्रतिम काव्यरचना*

 

*याद येस रोज माले..* 

 

मनी मायनी मायनी माले याद येस रोज

असं वाटसं मायना कोठे लेवो बरं सोध

मनम्हा जाईनं बठनी नही सोडत ती जागा

सुखदुःख चावयसं नही करत ती त्रागा…

 

याद येस माले तिनं कष्टानं ते रोज जीनं

डोकावरना पदर भरेल घर सालदारनं

गहू धवाले ती जाये गहू थायनाम्हा धोये

माटीमट्यारं धुईनं सुकाईन गहू खाये…

 

भरेल घरम्हांन व्हती नही उतनी मातनी

घरनी बरकत व्हती भाकर खावाडे सुखनी

लक्षुमीनं रूप तिनं ऱ्हाये सदा आबादानी

माय हिरिदम्हा ऱ्हास माय व्हयेना ती कोनी…

 

डोयाम्होरे नाचतसं कष्टाना त्या तिना दिनं

अशी उचली देवनी करी टाकं तिनं सोनं

तीते गई निंघी पन जीव झुरनी पडना

घरोघर महिमा से देखा आपली मायना..

 

प्रा.सौ.सुमती पवार.नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा