You are currently viewing जिल्ह्यात ब्रिटन रिटर्न आले आहेत का? तपासणीसाठी आदेश..

जिल्ह्यात ब्रिटन रिटर्न आले आहेत का? तपासणीसाठी आदेश..

ओरोस :

परदेशातून विशेषता ब्रिटन, युरोप येथून प्रवास करुन जिल्ह्यात आलेल्या लोकांची माहिती नगर प्रशासन आणि ग्राम प्रशासन घेत आहे.  या विषयी जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी सूचना दिल्या असल्याने आरोग्य विभाग व पोलिस प्रशासन यांनी याबाबत कारवाई सुरू केली आहे.

जिल्ह्यात नोव्हेंबर पासून आजमितीपर्यंत ब्रिटन रिटर्न कोणीही आले नसल्याची माहिती यादीत जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिली होती. मात्र आता परदेशातून महाराष्ट्रात आलेले आठ रुग्ण आढळल्याने राज्य शासनाने याबाबत गंभीर दखल घेतली असून याप्रकरणी प्रत्‍येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यात बिटन रिटर्न् आले आहेत का ? याची माहिती घेतली जात आहे.

ब्रिटनमधील नव्या कोरोना विषाणुमुळे राज्यात अधिक दक्षता घेतली जात असली. तरी परदेशातून अन्य राज्यात उतरून तेथून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या प्रवाशांचा ओघ लक्षात घेता जिल्हा स्तरावरही तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील ८ प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यात ही तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × two =