You are currently viewing आरोस परिवर्तन युवक मंडळाच्या वतीने आयोजित “धर्म संस्कार” कार्यक्रमात दुचाकी चोर पकडणाऱ्या युवकांचा सत्कार

आरोस परिवर्तन युवक मंडळाच्या वतीने आयोजित “धर्म संस्कार” कार्यक्रमात दुचाकी चोर पकडणाऱ्या युवकांचा सत्कार

सावंतवाडी :

तालुक्यातील आरोस परिवर्तन युवक मंडळाच्या वतीने रविवारी आरोस येथील श्री देवी माऊली मंदिर येथे रविवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ‘धर्मसंस्कार सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आरोस येथे दिनांक २२ ऑगस्ट रोजी भल्या पहाटे मोठ्या हिमतीने मोटार सायकल चोरांना पकडणारे धाडसी युवक संदेश देऊलकर व योगेश देऊलकर या दोन्ही भावांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर मार्गदर्शक व्याख्याते लक्ष्मीकांत कराड, प्रा. रुपेश पाटील, कवी दीपक पटेकर, माजी सरपंच बाबी परब, ग्राम.सदस्या मनिषा परब, रवी सातावळेकर, सुनील सावंत, केशव नाईक, दादा परब, बाबी आदी उपस्थित होते.

तसेच या कार्यक्रमासाठी संतोष परब. श्री.दादा घोगळे, तन्वी परब, संजय नाईक, निखिल नाईक, निलेश (बाळा) परब, मंदार नाईक, नंदू परब, आनंद घोगळे, आनु परब, बाबा मेस्त्री, सागर मडूरकर, समीर आरोसकर, भिवा नाईक तसेच आरोस परिवर्तन युवक मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला वर्ग व आरोस ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 1 =