You are currently viewing “तेजस” उद्यापासून पुन्हा धावणार

“तेजस” उद्यापासून पुन्हा धावणार

वृत्तसेवा

कोरोना महामारीमुळे जवळपास 10 महिन्यांच्या विश्रांतीनंतर कोकण रेल्वे मार्गावर धावणारी तेजस एक्स्प्रेस अखेर 20 डिसेंबरपासून पुन्हा एकदा धावणार आहे. पूर्वीप्रमाणेच आठवड्यातून पाच दिवस ही गाडी धावणार आहे.

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता 20 मार्चपासून रेल्वे सेवा बंद पडली होती. तेव्हापासून तेजस एक्स्प्रेसही आतापर्यंत बंदच होती. मात्र, आता हळूहळू सेवा पूर्ववत होऊ लागल्याने रेल्वे मंत्रालयाने ही गाडी सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. याबाबत कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार तेजस एक्स्प्रेस (02119/20) दि.20 डिसेंबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत आठवड्यातून पाच दिवस धावणार आहे. ही गाडी मुंबईतील सीएसएमटी स्थानकावरु पहाटे 5 वा. 50 मिनिटांनी सुटेल आणि गोव्यात करमाळीला ती दुपारी 2 वाजता पोहचेल. त्याच दिवशी ही गाडी दुपारी 2 वा.

40 मिनिटांनी करमाळीहून निघून रात्री 11.15 वाजता मुंबईत सीएसएमटी स्थानकावर पोहचेल. आठवड्यातील सोमवार तसेच गुरुवार वगळून पाच दिवस ही गाडी कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी तसेच सिंधुदुर्गात कुडाळ स्थानकावर थांबणार आहे. एक प्रथम श्रेणी वातानुकूलित चेअरकार तसेच 12 चेअरकार अशा 13 डब्यांसह ही गाडी धावणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + 13 =