You are currently viewing विशाल परब यांच्याकडून सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले यांना निमंत्रण..

विशाल परब यांच्याकडून सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले यांना निमंत्रण..

सावंतवाडी :

 

विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या प्रसिध्द गायक जुबिन नौटियाल यांच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनी सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले यांना दिले. दरम्यान यावेळी त्यांनी जिमखाना मैदानावर जावून कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. या कार्यक्रमासाठी हजारो प्रेक्षक उपस्थित राहणार आहेत, असा दावा करण्यात आला आहे. श्री. परब यांचा वाढदिवस १५ तारखेला होत आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत जुबिन नौटियालच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण श्री. परब यांनी आज संस्थानचे राजे खेमसावंत भोसले यांना दिले. यावेळी युवराज लखमराजे भोसले उपस्थित होते. यावेळी त्यांच्या समवेत प्रभाकर परब, मोहन सावंत, ओंकार पावसकर, तेजस माने, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी जिमखाना मैदानाची पाहणी केली. तत्पुर्वी येथील पाटेकर मंदिरात जावून त्यांनी श्रींचे दर्शन घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 2 =