You are currently viewing प्राणजीवन सहयोग संस्थेचे उपक्रम कौतुकास्पद – राजेंद्र पराडकर

प्राणजीवन सहयोग संस्थेचे उपक्रम कौतुकास्पद – राजेंद्र पराडकर

जिल्ह्यात मोफत सँनिटायझिंग करण्याचा प्राणजीवन संस्थेचा उपक्रम

कणकवली

कोरोनाच्या संकटकाळात गावातील लोकांच्या सुरक्षितेसाठी प्राणजीवन सहयोग संस्थचे संस्थापक अध्यक्ष ऊद्योजक संदीप चौकेकर यानी कोव्हीड 19 चा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्या संस्थेतर्फे मोफत सँनिटायझर फवारणी करण्याचा घेतलेला निर्णय खरोखरच कौतुकास्पद असल्याचे जि.प.चे उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यानी सांगितले.
प्राणजीवन सहयोग संस्था आयोजित मोफत फवारणी शुभारंभ मालवण तालुक्यातील आडवली गावातुन करण्यात आला.यावेळी ऊपस्थित जि.प.ऊपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर,संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर, अरुण लाड,आडवली ऊपसरपंच सोनाली पराडकर,पोलिस पाटील, चंद्रदीप मालंडकर ऊपस्थित होते.आडवली गावचे ऊपसरपंच सौ.सोनाली पराडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल,श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
प्राणजीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, कोव्हीड 19 चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी माझ्या जिल्ह्यातील जनतेचे जीवन सुखकर व्हावे याच भावनेतून आपण हे काम करत असल्याचे सांगुन यापुढेही आपल्या जिल्ह्यातील गोरगरीब जनतेसाठी काम करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिरवल गावचे सुपुत्र आणि मुंबई येथील उद्योजक संदीप चौकेकर यांनी संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या माध्यमातून लाँकडाऊनच्या कालावधीत कणकवली आणि मालवण तालुक्यातील गरजु लोकांना अन्न धान्य वाटप केले होते.तसेच
शिरवल गावात दुर्गामातेच्या आगमनावेळी घरोघरी वाफेच्या मशिनचे वाटप केले होते.
त्यांच्या या उपक्रमाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरगरीब जनतेकडून तसेच विवीध मंडळांकडुन प्राणजीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांचे कौतुक होत आहे.
शिरवल गावात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात उद्योजक संदिप चौकेकर नेहमीच योगदान देत असून सामाजिक बांधिलकी जोपासताना समाजसेवेचे व्रत घेतलेल्या संदीप चौकेकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कोरोनाच्या संकटकाळात सामाजिक बांधिलकी जोपासताना शिरवल गावासह कणकवली तालुक्यातील अनेक गावांमध्ये जाऊन संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी अन्नधान्य वाटप करुन लोकांना मदतीचा हात दिला आहे.सुमारे तीन हजारपेक्षा अधिक कुटुंबातील लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले होते. शिरवलचे गावचे सुपुत्र आणि मुंबई येथील उद्योजक संदिप चौकेकर यांनी आपल्या दातृत्वातून आणि कर्तृत्वातून केलेल्या सामाजिक कार्यातून आपल्या शिरवल गावाशी आणि कणकवली तालुक्याशी नाळ जोडली आहे.म्हणूनच त्यांच्या परोपकारी आणि दातृत्वाच्या गुणांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
मुंबईत उद्योगजगतात नावलौकिक कमावलेल्या मूळ शिरवल गावचे सुपुत्र असलेल्या संदीप चौकेकर यांनी आपल्या गावाशी नाळ घट्ट जोडून ठेवली आहे. शिरवल पंचक्रोशीतील शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात चौकेकर यांचे नेहमीच भरीव योगदान असते.आपल्या दातृत्वाने दानशूर व्यक्ती म्हणून ते प्रसिद्ध आहेत. खेडेगावात बालपण गेलेल्या चौकेकर यांना ग्रामीण भागातील व्यथांची जाण आहे. त्यामुळेच प्राधान्याने कणकवली तालुक्यातील ग्रामीण भागातील कुटुंबाना त्यांनी मदतीचा हात दिला असून उद्योजक संदीप चौकेकर यांच्या दातृत्वाबद्दल ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी त्यांचे कौतुक करत आभार मानले आहेत.
यावेळी कार्यक्रम प्रमुख प्रसाद मेहता,सहकार्यक्रम प्रमुख प्रशांत गावडे,भुषण धुरी ऊपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीकृष्ण यादव, माजी सरपंच मनोज राणे, रामचंद्र गोळवणकर, प्रदीप पेंडुरकर, माजी सरपंच प्रवीण तांबे,सुचित गुरव,राजाराम दळवी,गुरुनाथ चौकेकर, अरुण चौकेकर,अजित पेंडुरकर,अनिल पराडकर, विजय पराडकर,सचिन धुरी,स्वप्नील पुजारे, संदेश धुरी, महेश पराडकर,मंगेश पराडकर,कल्याण पराडकर यानी सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − 5 =