You are currently viewing माजी मुख्यमंत्री भाजपा नेते खा.नारायण राणे यांना भारत सरकारने दिली “वाय”दर्जाची सुरक्षा

माजी मुख्यमंत्री भाजपा नेते खा.नारायण राणे यांना भारत सरकारने दिली “वाय”दर्जाची सुरक्षा

दोन अधिकाऱ्यांसह ११ सुरक्षा रक्षकांचे पथक तैनात

केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला होता सुरक्षेचा आढावा

कणकवली
माजी मुख्यमंत्री, भाजपा नेते खासदार नारायण राणे यांच्या सुरक्षेत आणखीन वाढ करण्यात आली आहे. त्यांना भारत सरकारची “वाय” दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.यात दोन अधिकाऱ्यास ११ सुरक्षा रक्षकांचे पथक तैनात केले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने आढावा घेऊन काही नेत्यांच्या सुरक्षेत वाढ केली असून, त्यामध्ये भाजपा खासदार नारायण राणे यांना ही ‘वाय’ दर्जाची सुरक्षा दिली आहे. सध्या राज्यसरकरची ‘वाय’सुरक्षा आहे त्याचा आढावा केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला आणि भारत सरकारच्या ‘वाय’ दर्जाची सुरक्षा वाढविली आहे. माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे हे स्पष्टवक्ते म्हणून देशभर परिचित आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + 15 =