You are currently viewing पडते यांच्या दुःखात दोडामार्ग शिवसेना सहभागी

पडते यांच्या दुःखात दोडामार्ग शिवसेना सहभागी

दोडामार्ग
शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असुन त्यांच्या दुःखात दोडामार्ग तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व सदस्य कायमच पाठीशी आहेत. त्यांचा दिवंगत मुलग देवेंद्र पडते याने जगाचा घेतलेला निरोप हा अनाकलनीय व दुर्दैवी आहे, अशा भावना कै.देवेंद्र पडते यांच्या शोकसभेत दोडामार्ग येथील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी व्यक्त केल्या. आज दोडामार्ग येथील शिवसेना कार्यालयात शोकसभेचे आयोजन करून दिवंगत देवेंद्र पडते यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी दोडामार्ग तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, तालुका संघटक संजय गवस,प्रेमानंद देसाई, सुनंदा धर्णे, विनिता घाडी, गोपाळ गवस, भिवा गवस,दयानंद धाऊसकर,भगवान गवस, मिलिंद नाईक, विजय जाधव,लक्ष्मण आयनोडकर, रामदास मेस्त्री,गुरुदास सावंत यांसह शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + 7 =