You are currently viewing सातार्डा मार्गे गोव्यात होणाऱ्या विनापरवाना वाळू वाहतूकीवर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडणार –  राजन मुळीक

सातार्डा मार्गे गोव्यात होणाऱ्या विनापरवाना वाळू वाहतूकीवर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडणार –  राजन मुळीक

बांदा

मळेवाड, कोंडुरा-सातार्डा मार्गे गोव्यात रात्रीच्या वेळी आठ ते दहा डंपर मधून विनापरवाना वाळू वाहतूक केली जाते. मुख्यतः याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.

परिणामी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल एका रात्रीत बुडतो. इन्सुली तपासणी नाक्यावर जशी कारवाई करण्यात आली त्याच पद्धतीने कारवाई करावी व शासनाचा बुडणारा महसूल वाचवावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषद माजी सदस्य राजन उर्फ राजू मुळीक यांनी दिला आहे.

सिंधुदुर्गातून गोव्यात अनधिकृतरित्या नेल्या जाणाऱ्या वाळूचे प्रमाण वाढले आहे. याला दरही अगदी सोन्याचा मिळत आहे. वाळू जितकी लांबपर्यंत न्यायची तितकी त्याची किंमत वाढत आहे. सद्यस्थितीत वाळूच उपलब्ध नसल्याने गोव्यातून मोठी मागणी आहे. मळेवाड कोंडुरा सातार्डा मार्गे रोज आठ ते दहा वाळूने भरलेले डंपर गोव्यात जातात. अशा विनापरवाना वाळू वाहतुकीवर पोलीस किंवा महसूल विभाग कारवाई का करत नाही, असा सवाल राजू मुळीक यांनी केला.

अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शासनाचा दररोज लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. त्यामुळे अशा विनापरवाना वाहतुकीवर कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद माजी सदस्य राजू मुळीक यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा