You are currently viewing जलजीवन मिशन योजनेतून वर्दे गावातील वगळलेल्या ‘त्या’ वाडींचा फेरसर्व्हे करा

जलजीवन मिशन योजनेतून वर्दे गावातील वगळलेल्या ‘त्या’ वाडींचा फेरसर्व्हे करा

*माजी खासदार निलेश राणे यांच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना सूचना..*

कुडाळ :

 

कुडाळ तालुक्यातील मौजे वर्दे येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळयोजना प्रस्तावित आहे. जलजीवन मिशन योजना गावात राबविण्यासाठी वर्दे ग्रामपंचायत कडून एकूण बारा प्रस्ताव सादर केले होते मात्र प्रत्यक्षात केवळ पाच प्रस्तावांना मंजुरी मिळाली. या संदर्भात वर्दे गावातील गावठाण वाडी, कोकेमळा वाडी व खालची पालववाडी यांना जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याची तक्रार वर्दे ग्रामस्थ तुषार सावंत यांनी निवेदनाद्वारे निलेश राणे यांच्याजवळ केली होती. त्याची गांभीर्याने दखल घेत निलेश राणे यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ या तिन्ही वाडींचा फेरसर्व्हे करून अंदाजपत्रक बनवत निविदा करण्याच्या सूचना केल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + three =