You are currently viewing खारेपाटण येथे एसटी कलंडली 

खारेपाटण येथे एसटी कलंडली 

कणकवली

राजापूर डेपोची खारेपाटण -तळगाव- राजापूर ही एस. टी .बस खारेपाटण बसस्थानकातून सुटल्यानंतर समोरून आलेल्या एस. टी. गाडीला साईड देताना बाजूला कलंडल्याने अपघात झाला. सुदैवाने गाडीत किरकोळ प्रवासी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.दरम्यान सदर अपघात हा खारेपाटण मुख्य रस्त्यावर अवास्तव खाजगी वाहने उभी करून ठेवत असल्यामुळे झाला असल्याचे बोलले जाते. मुंबई – गोवा महार्गावरून खारेपाटण बाजारपेठ तथा एस टी बसस्थानकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्या मध्यवर्ती बँकेच्या इमारतीच्या पुढील रस्त्यावर सकाळी 11 वाजता हा अपघात घडला.

खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने कोविड – १९ च्या काळात तसेच गौरी गणपतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर खाजगी वाहन चालकांनी आपली वाहने कुठे पार्क करावी याबाबतचे सूचना फलक खारेपाटण शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले असून ग्रामस्थांनी याचे काटेकोरपणे पालन केल्यास अपघात होणार नाही. आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे असे खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी सांगितले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा