फोंडाघाटच्या मनस्या फाले हिला ‘बेस्ट कॅडेट’ स्कॉलरशिप प्रदान;
राष्ट्रीय स्तरावरील ‘गोल्ड मेडल’ कामगिरीचे सार्थक
फोंडाघाट :
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी, फोंडाघाट संचलित न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजची राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागाची कॅडेट सार्जंट मनस्या निलेश फाले हिला ५८- महाराष्ट्र बटालियन एनसीसी सिंधुदुर्ग येथे कमांडिंग ऑफिसर कर्नल अजयराज एल. यांच्या शुभहस्ते कोल्हापूर ग्रुप अंतर्गत प्रतिष्ठेची ‘बेस्ट कॅडेट’ स्कॉलरशिप प्रदान करण्यात आली. ५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी सिंधुदुर्ग (ओरोस) येथे आयोजित विशेष कार्यक्रमात बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अजयराज एल.यांच्या हस्ते सार्जंट मनस्या फाले हिला ही बेस्ट कॅडेटची स्कॉलरशिप देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना कर्नल अजयराज यांनी मनस्याने ‘स्नॅप शूटिंग मध्ये राष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या अभूतपूर्व सुवर्णपदकाचा (Gold Medal) विशेष गौरव केला आणि तिची ही कामगिरी इतर कॅडेट्ससाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
