विनया सातार्डेकर यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

मसुरे :

मुंबई- पारस काव्य, कला, जनजागृती संस्था सानपाडा, नवी मुंबई तर्फे राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार नुकताच आदर्श शाळा जोशी विद्यामंदिर जामसंडे नं. १, च्‍या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका, मसुरे गावाच्या रहिवाशी, आदर्श प्राध्यापिका सौ विनया विजय सातार्डेकर मॅडम यांना नवी मुंबई सानपाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता भवन येथे देण्यात आला.

विनया सातार्डेकर यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक वातावरण निर्माण केले. स्कॉलरशिप, नवोदय विद्यालय उपक्रम सुरु करुन राबविले. ५ वी स्कॉलरशिप नियोजन केल्यामुळे त्यांच्या प्रशालेतील विद्यार्थी गुणवत्ता यादीत येत आहेत . शाळेची पटसंख्या वाढ करण्यात मोठा वाटा आहे. शालेय तसेच सामाजिक उपक्रमात कृतीशील सहभाग, आज जामसंडे नं. १ ही शाळा आदर्श शाळा मॉडेल स्कूल म्हणून विकसित झालेली आहे. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केले आहे.

विद्यार्थ्यांसाठी पालक, समाजाच्या सहकार्यामुळे भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आले आहे. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम या स्पर्धा परीक्षेमधून या प्रशालेतील २ मुलींची इस्त्रोसाठी निवड झाली. त्यांच्या नेहमीच्या पथक प्रयत्नामुळे येथील दानशूर दात्यांनी शाळेसाठी भरीव मदत दिलेली आहे. विनया सातार्डेकर यांनी दिक्षिता दिलीप पालव या गरजू मुलीचे पालकत्व स्वीकारलेले आहे. सानपाडा नवी मुंबई येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विनया सातार्डेकर यांना शाल श्रीफळ मानपत्र गौरव चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर -प्रतिक्रिया व्यक्त करताना विनया सातार्डेकर म्हणाल्यात शाळा व्य. समिती, पालक शिक्षक संघ, माता-पालक संघ, सर्व पदाधिकारी, सर्व पालक वर्ग, सर्व सहकारी शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण विभागाच्या सहकार्यामुळे मी विविध उपक्रम राबवू शकले. माझे पती,माझा मुलगा, माझे कुटुंब यांचा या पुरस्कारात मोठा वाटा असल्याचे त्या म्हणाल्या. यापुढेही शिक्षण क्षेत्रामध्ये सर्वांना सोबत घेऊन काम करणार असून ही प्रशाला भविष्यात राज्यांमध्ये नावारूपात आणण्याचा प्रयत्न करेन.

आजचा हा राज्यस्तरीय पुरस्कार देणाऱ्या पारस काव्य कला जनजागृती संस्थे ची मी कायम ऋणी राहील. यापूर्वी सुद्धा विनया सातार्डेकर यांना अनेक तालुका जिल्हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. या पुरस्कारामुळे समाजाच्या सर्वस्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + 17 =