विश्वकर्मा समाजाचा सरपंच दक्षता मेस्त्रींना ठाम पाठिंबा
झाराप ग्रामपंचायत प्रकरणात पहिल्या टप्प्यात यश; अन्यायग्रस्तांच्या पाठीशी कायम उभे राहणार – दिनेश मेस्त्री
सिंधुदुर्ग :
झाराप ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. दक्षता मेस्त्री यांच्यावरील प्रकरणात सिंधुदुर्ग जिल्हा विश्वकर्मा समाजाने पहिल्या टप्प्यात यश मिळवल्याचे जाहीर केले आहे. या प्रकरणात समाजाने एकजुटीने भूमिका घेत सरपंच दक्षता मेस्त्री यांना पाठिंबा दर्शविला.
या लढ्यात श्री. दिनेश मेस्त्री तसेच समाज बांधवांनी सक्रिय सहकार्य केले. समाजातील अन्यायग्रस्त व्यक्तींच्या पाठीशी विश्वकर्मा समाज भविष्यातही ठामपणे उभा राहील, असा विश्वास श्री. दिनेश मेस्त्री यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केला.
यावेळी समाजातील विविध पदाधिकारी व बांधवांनी एकत्र येत ऐक्याची भावना व्यक्त केली असून, समाजहितासाठी संघटितपणे कार्य करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.
– श्री. दिनेश मेस्त्री
सदस्य, विश्वकर्मा समाज – जिल्हा सिंधुदुर्ग
संपर्क : 9767081686
