You are currently viewing नेमळे येथे श्री देवी सातेरी पंचायतनाचा पुनःप्रतिष्ठापना वर्धापन दिन होणार साजरा 

नेमळे येथे श्री देवी सातेरी पंचायतनाचा पुनःप्रतिष्ठापना वर्धापन दिन होणार साजरा 

नेमळे येथे श्री देवी सातेरी पंचायतनाचा पुनःप्रतिष्ठापना वर्धापन दिन होणार साजरा

२३ ते २४ मे दरम्यान धार्मिक विधी, भजन आणि दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन

सावंतवाडी :

तालुक्यातील नेमळे येथील ग्रामदैवत श्री देवी सातेरी पंचायतनाच्या पुनःप्रतिष्ठापना वर्धापन दिनानिमित्त शनिवार दि. २३ मे ते रविवार दि. २४ मे २०२६ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मंदिर परिसरात भक्तिमय वातावरणात चंडियाग सोहळा संपन्न होणार असून भाविकांसाठी तीर्थप्रसाद व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या दोन दिवसीय धार्मिक सोहळ्यात परिसरातील भाविक, देणगीदार, पाहुणे मंडळी तसेच शिमधडे यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचा कृपाप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख गावकर मंडळी व ग्रामस्थांनी केले आहे.
शनिवार दि. २३ मे रोजी सकाळी ७ ते ११ या वेळेत शांतीपाठ, देवतांची प्रार्थना, गणपती पूजन, आचार्य वरण, प्रकारशुद्धी देवता स्थापना, चंडीपाठ, ग्रहयाग, आरती व तीर्थप्रसाद असे धार्मिक विधी पार पडणार आहेत. सायंकाळी ६ वाजल्यापासून भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार dि. २४ मे रोजी सकाळी ७ ते दुपारी १२.३० या वेळेत आवाहित देवता पूजन, कुंकुमार्चन, चंडीपाठाचे हवन, बलिदान, पूर्णाहुती, आरती, महागाऱ्हाणे, तीर्थप्रसाद व महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी ६ वाजल्यापासून भजन कार्यक्रम रंगणार असून रात्री १० वाजता जय हनुमान दशावतार नाट्य मंडळाचा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्यामुळे नेमळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांकडून कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा