You are currently viewing कुडाळ येथे उद्या गिरणी कामगार मेळावा

कुडाळ येथे उद्या गिरणी कामगार मेळावा

कुडाळ येथे उद्या गिरणी कामगार मेळावा

कुडाळ

सर्व श्रमिक संघटनेच्या गिरणी कामगार विभागातर्फे २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ रेल्वेस्टेशन मार्गावरील सिद्धिविनायक सभागृहात जिल्ह्यातील गिरणी कामगार व वारसदारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात म्हाडाकडून गिरणी कामगार व वारसदारांच्या ऑनलाईन पात्रता निश्चिती करण्याकरिता अर्ज भरण्याबाबत जाहीर करण्यात आलेल्या सूचनेची माहिती देण्यात येणार आहे. तसेच हे ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करण्याबाबत माहिती देण्यात येईल. गिरणी कामगार व वारसदारांना मुंबईतच घर मिळण्याबाबत रुपरेषा व आंदोलनाबाबत एकंदरीत दिशा निर्देश ठरविण्याची घोषणा करण्यात येणार आहे. या मेळाव्याला कॉ. उदय भट, कॉ. बी. के. आंबे, कॉ. संतोष मोरे व कॉ. अनंत मालप मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई येथून उपस्थित राहणार. आहेत. जिल्ह्यातील गिरणी कामगार व वारसदारांनी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहवे, असे आवाहन प्रमुख संघटक शांताराम परब यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा