You are currently viewing सावंतवाडीत मुस्लिम समाजासाठी बहुउद्देशीय सभागृहासाठी निधी मिळावा

सावंतवाडीत मुस्लिम समाजासाठी बहुउद्देशीय सभागृहासाठी निधी मिळावा

माजी नगरसेविका अफरोज राजगुरू यांची मागणी

सावंतवाडी

सावंतवाडी शहरातील बाहेरचावाडा ख्वाजा मार्ग येथील नगरपालिकेच्या रिकाम्या जागेत मुस्लिम समाजास उपयोगी पडेल असा बहुउद्देशीय हॉल बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका अफरोज राजगुरू यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष हुजूर इनामदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तिकार राजगुरू, शिवाजी घोगळे, बाळ कनयाळकर, बाबा खतीब, शफिक खान, नजीर शेख, जावेद शेख, बावतिस फर्नांडिस, सुलेमान बेग, हिदयत्तुला खान, दर्शना बाबर देसाई, रझाक खान, संतोष जोईल, आसिफ ख्वाजा, जहिरा ख्वाजा, अर्शद बेग आदी उपस्थित होते.

या निवेदनात असे म्हटले आहे की सावंतवाडी नगर परिषदेच्या बाहेरचा वाडा येथे पूर्ण मुस्लिम समाजाची वस्ती आहे नगरपालिकेचे सौचालय निर्देशित केलेले आहे त्यामुळे तेथे उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेत बहुउद्देशीय इमारतीसाठी राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून द्यावा या इमारतीचा फायदा स्थानिक मुस्लीम जनतेला विविध सभा साठी होईल तर या बहुउद्देशीय इमारतीसाठी श्री इनामदार हे जातीनिशी लक्ष देतील असा विश्वास राजगुरू यांनी व्यक्त केला आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा