You are currently viewing फोंडाघाट हवेलीनगर येथे अपघातात महिला जखमी

फोंडाघाट हवेलीनगर येथे अपघातात महिला जखमी

कणकवली

फोंडाघाट हवेलीनगर येथील साईबाबा मंदिर समोर झालेल्या अपघातात ऍक्टिव्हा वरील उर्मिला बाळकृष्ण हुले ( वय 50, रा.हरकुळ खुर्द हुलेवाडी ) यांच्या डोक्याला मार लागून जखमी झाल्या आहेत. तर ऍक्टिव्हा चालक भगवान हा किरकोळ जखमी झाला. हा अपघात आज सकाळी सव्वा अकरा च्या सुमारास घडला. भगवान हुले हा आपली आई उर्मिला हिच्यासह आपल्या ताब्यातील ऍक्टिव्हा दुचाकीने फोंडाघाट येथे जात होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी हुले यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या गाडीला एका आलिशान कार ने धडक दिल्याने त्यांची दुचाकी हवेलीनगर येथे कलंडून अपघात घडला.

सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी अपघातस्थळापासून गेलेल्या त्या संशयास्पद कारचालकाचा थांगपता लावत कारचालकाला फोंडाघाट येथे बोलवले आहे. त्या कार चालकाकडे चौकशी केल्यावर अपघात कारने धडक दिल्यामुळे घडला की दुचाकी खड्ड्यात गेल्यामुळे घडला हे निष्पन्न होईल अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान सकाळी अपघात घडताच हवेलनगर येथील ग्रामस्थांनी ऍम्ब्युलन्स बोलावत जखमीना फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. स्थानिक ग्रामस्थ अजित नाडकर्णी यांनी फोंडाघाट आउट पोस्ट चे हवालदार वंजारे यांना अपघाताची माहिती दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + eleven =