You are currently viewing वेताळ प्रतिष्ठानच्या वतीने कै.गुरुदास तिरोडकर यांना श्रध्दांजली देण्यासाठी १५ फेब्रुवारी रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन

वेताळ प्रतिष्ठानच्या वतीने कै.गुरुदास तिरोडकर यांना श्रध्दांजली देण्यासाठी १५ फेब्रुवारी रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन

वेताळ प्रतिष्ठानच्या वतीने कै.गुरुदास तिरोडकर यांना श्रध्दांजली देण्यासाठी १५ फेब्रुवारी रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन.*

सावंतवाडी

गुरुदास तिरोडकर, प्रतिष्ठानचे विश्वासार्ह आणि समर्पित कार्यकर्ते होते. त्यांच्या आजपर्यंतच्या अथक सेवेला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला अनोख्या पद्धतीने सन्मान देण्यासाठी वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आणि सहयोगी संस्थांच्या आणि कै.गुरुदास तिरोडकर मित्रपरिवार यांच्या सहकार्याने महारक्तदान शिबिराचे आयोजन *शनिवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ रोजी उत्सव मंगल कार्यालय तुळस येथे सकाळी ९.०० वा.* आयोजित केलेले आहे.

वेताळ प्रतिष्ठानचे हे सलग २८ वे रक्तदान शिबिर असून या रक्तदान शिबिरासाठी सिद्धार्थ कलाविष्कार युवक मंडळ तुळस, आनंदयात्री वांड.मय मंडळ वेंगुर्ला,श्री देवी शारदा प्रतिष्ठान रामघाट-वेंगुर्ला,बाल गोवर्धन कला-क्रीडा मंडळ तुळस- राऊळवाडा, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग या सहयोगी संस्था असून रक्तपेढी सावंतवाडी आणि रक्तपेढी एस.एस.पी.एम. पडवे यांच्या सहकार्याने सदर रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. सर्व रक्तदात्यांचा गुरुदास यांच्या स्मृति प्रित्यर्थ मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात येईल.अधिक माहितीसाठी आणि रक्तदाता म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी रक्तमित्र संघटक महेश राऊळ (९४०५९३३९१२) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस चे सचिव प्रा.डॉ.सचिन परुळकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा