You are currently viewing कुंभारमाठ येथे  प्रधानमंत्री जनमन घरकुलांची पाहणी

कुंभारमाठ येथे  प्रधानमंत्री जनमन घरकुलांची पाहणी

कुंभारमाठ येथे  प्रधानमंत्री जनमन घरकुलांची पाहणी

अप्पर आयुक्त डॉ. माणिक दिवे यांची भेट; कामे मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना

मालवण :

कुंभारमाठ येथे प्रधानमंत्री जनमन (PM JANMAN) योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घरकुलांची अप्पर आयुक्त (विकास), कोकण विभाग डॉ. माणिक दिवे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या घरकुलांच्या बांधकामाची प्रगती तसेच लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या मूलभूत सुविधांची सविस्तर माहिती घेतली.
घरकुलांची कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. प्रधानमंत्री जनमन योजनेच्या माध्यमातून कातकरी आदिवासी व वंचित घटकांतील पात्र कुटुंबांचे पक्क्या घराचे स्वप्न साकार होत असून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होत असल्याचे डॉ. दिवे यांनी नमूद केले. कुंभारमाठ येथे सुरू असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त करत त्यांनी संबंधित यंत्रणेला शुभेच्छा दिल्या.
या पाहणी दौऱ्यावेळी पंचायत समिती सभापती सौ. प्रज्ञा चव्हाण, उपसभापती श्याम झाड, सरपंच सौ. पुनम वाटेगावकर, उपसरपंच जीवन भोगावकर, ग्रामपंचायत सदस्य राहुल परब, माजी गटविकास अधिकारी शाम चव्हाण, विद्यमान गटविकास अधिकारी सावंत, विस्तार अधिकारी परब, बांगर तसेच ग्रामपंचायत अधिकारी प्रमोद निकम आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा