You are currently viewing सावंतवाडीतील कार बांदा दुसऱ्या पुलावरून सुसाट ६० फूट खोल ओहोळत कोसळली

सावंतवाडीतील कार बांदा दुसऱ्या पुलावरून सुसाट ६० फूट खोल ओहोळत कोसळली

सावंतवाडीतील कार बांदा दुसऱ्या पुलावरून सुसाट ६० फूट खोल ओहोळत कोसळली, कार मधील सर्व सुरक्षित

बांदा

मुंबई गोवा महामार्गावर बांदा बसस्थानक नजीक असलेल्या दुसऱ्या पुलावरून भरधाव वेगात असलेली कार ओहोळातील पाण्यात कोसळून अपघातग्रस्त झाली. हा अपघात रात्री २ वाजण्याच्या सुमारास झाला. कारमधील सहाही युवक आश्चर्यकारकरीत्या बचावले आहेत.

आज सकाळी ही घटना येथील नजीकच असलेले राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रशांत पांगम यांच्या निदर्शनास आली. त्यांनी याची माहिती बांदा पोलीस व स्थानिक ग्रामस्थांना दिली. बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कार (एमएच ०७ एजी ०००४) रात्री ओहोळात कोसळली. मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्याने व मुसळधार पाऊस सुरु असल्याने अपघात झाल्याचे लक्षात आले नाही. सदर कार सावंतवाडी येथील असल्याची समजते.

पुलापासून १०० मीटर मागे सदर कार डिव्हायडर वर चढली व सुसाट वेगाने स्ट्रीट लाईटचा पोल तोडून पोलवरून सुमारे ६० फूट खोल ओहळात कोसळली. कार मध्ये सावंतवाडी येथील सहा युवक होते. सहाही युवक आश्चर्यकारक रित्या बचावले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा