You are currently viewing महिला भजनी महासंघ आयोजित चैत्रगौरी पूजन व आनंद मेळावा उत्साहात संपन्न

महिला भजनी महासंघ आयोजित चैत्रगौरी पूजन व आनंद मेळावा उत्साहात संपन्न

महिला भजनी महासंघ आयोजित चैत्रगौरी पूजन व आनंद मेळावा उत्साहात संपन्न

प्राधिकरण निगडी-(प्रतिनिधी)

आपले सण संस्कृती ही शहरी भागात हळूहळू कमी होत आहे. त्या सणांची व संस्कृतीची ये गडणाऱ्या पिढीला माहिती व्हावी व आपली संस्कृती जतन व्हावी हा हेतू मनात ठेवून चैत्रगौरीच्या पूजनाचे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ संस्कृती संवर्धन व विकास महासंघ विभागातील महिला भजनी महासंघाने नुकताच खास महिलांसाठी आनंद मेळावा कार्यक्रम घेतला.
प्रस्ताविक करताना ज्योतीताई कानेटकर म्हणाल्या “चैत्र महिना म्हणजे हिंदू नवीन वर्षाला सुरुवात सगळीकडे झाडांना हिरवी पालवी फुटलेली असते. चैत्र महिन्यात अनेक उत्सव येतात त्यामुळे सर्वत्र उत्साहात वातावरण असते. त्याच अनुषंगाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.”
आनंद मेळाव्याला मार्गदर्शन करताना ह भ प किसन महाराज चौधरी म्हणाले,”आज आपल्या सर्वांच्या आयुष्यात एका गोष्टीचा वारंवार अभाव दिसून येतोय आणि ती गोष्ट म्हणजे “आनंद” .खरोखरंच दुर्मिळ होत चाललाय,असं मला रोज जाणवत. समुपदेशनासाठी येणाऱ्या अनेकांना मी नेहमी एक प्रश्न विचारतो की तुम्ही का जगता? तुमच्या आयुष्याचा अर्थ काय? तुम्हाला नक्की आयुष्यात काय हवय? किंवा तुमच्या आयुष्यच ध्येय काय? बहुतेकांना त्याच समर्पक उत्तर देता येत नाही; कारण या गोष्टीचा आपण कधी विचारच केलेला नाही. आपण असेच जगत असतो. ध्येयहीन,दिशाहीन. बरेचजण मी दुसऱ्यांसाठी जगतो असं उत्तरही देतात. या सर्व उत्तरांमागे वैचारिक गोंधळ किंवा भावनिक असंतुलनचं बऱ्याच वेळा दिसत.
आनंद नेहमी दुसऱ्या व्यक्तीवरच अवलंबून ठेवलेला आहे. कुठून आला माझ्यावर हा संस्कार? याच मूळ आपल्या लहानपणातच दडलेल आहे. लहानपणी मी चांगले मार्कर्स मिळवले, की आई-बाबा आनंदी,शिक्षक आनंदी आणि मग मी. म्हणजेच इतरांच्या आनंदावर माझा आनंद अवलंबून आहे, हा संस्कार तेव्हापासून पक्का झाला आहे. त्यामुळे आनंदासाठी मी नेहमीच इतरांवर अवलंबून राहू लागलो आणि आजच्या आयुष्यात मी आनंदी नसण्याचं ते प्रमुख कारण बनलं आहे.
वस्तुतः कोणतीही भौतिक वस्तू ही आपल्याला ‘कम्फर्ट’ देऊ शकते. उदाहरणार्थ, ‘लक्झरी कार’ मधला एसी आपल्याला कम्फटेबल फील देईल; पण आनंद देऊ शकत नाही. आपण ‘फिजिकल कम्फर्ट’ आणि हॅपिनेस याची गल्लत करत आहोत. यातून संस्कार असा होतो, की माझा आनंद कारवर अवलंबून आहे. म्हणजे कारमुळे मी आनंदी हे समीकरण मला चुकीचं वाटत. मोठं घर, कार, चैनीच्या इतर वस्तू या मला भोतिक सुख देऊ शकतील; म्हणजेच प्लेजर देतील; पण हॅपिनेस नाही. हे आपण समजून घेतलं पाहिजे.
उपभोग आणि आनंद यातील फरक आपण समजून घेतला पाहिजे. कोणतीही निर्जीव वस्तू ही फक्त निम्मितमात्र असते. म्हणजेच ती स्टिम्युलस म्हणून काम करते; पण नंतर होणारा आनंद ही माझी स्वतःचीच निर्मिती आहे.
आंतरिक आनंद माझ्या विचारांमध्येच दडलेला आहे. आपण खरा आनंद आजपर्यंत फार वेळा अनुभवलाच नसल्यान तो आपण बाहेर शोधत आहोत. वास्तविक या आनंदाचा निर्माता मीच आहे, हे कळणं अनुकरण केल्यामुळे तणाव, राग, दुःख, द्वेष अशा नकारात्मक भावना आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत, असं आपण मानून चाललो आहोत; पण मी स्वतःला किती त्रास करून घ्यायचा,किती वेळा upset व्हायचं हे माझ्याच हातात आहे. याचा आपल्याला विसर पडलेला दिसतो. आपण मुळातच आनंदी आहोत, हे आपण विसरून गेलो आहेत. अविद्येची अमावस्या संपवून भजन सेवेच्या माध्यमातून प्रेमाचा,ज्ञानाचा, शांतीचा दिवा लावून आपल्या आयुष्यात परिवर्तन घडविण्याचा आज निश्चय करूयात. तुमच्या आयुष्यात अमर्याद आनंदाचा नक्की वर्षाव करेल, अशी मला खात्री आहेच;पण या सर्व गोष्टींचा मीच निर्माता आहे, ही जाणीव मात्र विसरू देऊ नका.”
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ज्योतीताई कानिटकर आणि सहकारी भगिनींनी स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेचे धडे दिले.
डाळ कैरी व पन्हेचा आस्वाद घेत कार्यक्रमातील सांगता झाली.
संस्कृती संवर्धन विकास महासंघाचे सचिव शिवानंद चौगुले, नगरसेविका , माजी उप नगराध्यक्षा सौ.शैलजा मोरे,भजनी महासंघाचे प्रणेते अच्युत होनप काका यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेला पूजन करून कार्यक्रमाला शुभारंभ केला.
सुमारे १०० महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या.
ज्योती कानेटकर यांनी सूत्रसंचालन केले व माधुरीताई ओक यांनी आभार व्यक्त केले.

*संवाद मिडिया*

*गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या हक्काचे घर बुक करा*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*1 BHK & 2 BHK फ्लॅट्स*

*🏤”दर्पण कन्स्ट्रक्शन”*
*🏚️सावंतवाडी🌳*

*घेऊन आले आहेत…! अगदी 🏞️नरेंद्र डोंगराच्या🌳 कुशीत…! प्रसिद्ध माठेवाडा🛕 परिसरात*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*📲 अधिक माहितीसाठी संपर्क साधा :-*👇
*9890968845 / +918379896943*

*🏠ऑफिस :- 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग*

*🌐Advt Web link*

———————————————

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 1 =