You are currently viewing आंबोली-कामतवाडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ…

आंबोली-कामतवाडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ…

केसरकरांकडून निधी उपलब्ध; ग्रामस्थांनी मानले आभार…

आंबोली

येथील कामतवाडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज सावंतवाडी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांच्या हस्ते करण्यात आला. या रस्त्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या आमदार निधीतून तब्बल पाच लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. दरम्यान रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने ग्रामस्थांच्या वतीने केसरकर यांचे आभार मानण्यात आले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, आंबोली सरपंच सौ. सावित्री पालयेकर, शिवसेना विभाग प्रमुख विलास गावडे, शाखा प्रमुख हेमंत नार्वेकर, माजी सरपंच जगन्नाथ गावडे, विशाल बांदेकर, शंबा गावडे, शशिकांत गावडे, लबू गावडे, अंकुश गावडे, बाळा गावडे, श्री. नाटलेकर तसेच शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संस्थेने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा