You are currently viewing भिरवंडे येथील सेवानिवृत्त पोलीस सब-इन्स्पेक्टर सुनील सावंत यांच्यासह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश…!

भिरवंडे येथील सेवानिवृत्त पोलीस सब-इन्स्पेक्टर सुनील सावंत यांच्यासह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश…!

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत प्रवेश…!

कणकवली

कणकवलीत आज मेळावा शिवसैनिकांचा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात भिरवंडे येथील सेवानिवृत्त पोलीस सब-इन्स्पेक्टर सुनील वसंत सावंत (मुंबई) सध्या रा.भिरवंडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत, विधानसभा प्रमुख संदेश पटेल मार्गदर्शनाखाली व ब्रिगेड सुधीर सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा झेंडा हातात देत. भगव्या फीती गळ्यात घालून त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. यामध्ये भिरवंडे मधील अनिल सावंत सागर सावंत देवेंद्र सावंत प्रमोद सावंत आदींनी सेनेत प्रवेश केला.यावेळी जोरदार घोषणा बाजी करण्यात आली.

याप्रसंगी व्यासपीठाव जिल्हाप्रमुख संजय आग्रे, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा गायकवाड, उपजिल्हा प्रमुख महिंद्र सावंत,बबन शिंदे, संदेश पटेल,शरद वायंगणकर, भूषण परूळेकर, जिल्हा प्रमुख ( सोशल मीडिया) श्री महेश तेली,सुनील हरमलकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 3 =