You are currently viewing प्रस्तावित सुधारित संच मान्यता निकष लागू केल्यास तीव्र आंदोलन करु…

प्रस्तावित सुधारित संच मान्यता निकष लागू केल्यास तीव्र आंदोलन करु…

मुख्याध्यापक संघटना जिल्हा अध्यक्ष वामन तर्फे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीले संघटनेच्यावतीने पत्र.

कासार्डे : दत्तात्रय मारकड

आयुक्त शिक्षण यांनी दि. 13 जुलै रोजी अप्पर मुख्य, सचिव शालेय शिक्षण विभाग, मुंबई यांना सादर केलेल्या शिक्षक संच मान्यता शिफारशी तात्काळ रद्द कराव्यात अशी आग्रही मागणी करणारे पत्र सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने अध्यक्ष वामन तर्फे यांनी मेलद्वारे पाठवले आहे.
या शिफारशी लागू केल्यास राज्यातील ग्रामीण, डोंगराळ, दुर्गम भागातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद होतील, विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार नाही, विद्यार्थी काही विषयांच्या शिक्षणापासून वंचित राहतील, मराठी माध्यमाच्या शाळांचे अस्तित्व धोक्यात येईल, सर्वच शाळांमधील शिक्षक कमी होतील, विविध विषयांचे सक्षम शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी मिळणार नाहीत, विद्यार्थी दर्जेदार, मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या मुलभुत हक्कापासून वंचित राहतील, महाराष्ट्रातील अनुदानित शिक्षण व्यवस्था बंद पडेल, स्वयं अर्थसहाय्यित शाळांची फी गोरगरिब, वंचित गटातील पालकांच्या विद्यार्थ्यांना फी परवडणारी नसल्याने त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची दारे बंद होतील असे या पत्राद्वारे मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले असून दि. १३/७/२० चे प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील शिक्षक संवर्गातील संच मान्यतेचे सुधारित निकष सुचविणारे आयुक्तांचे पत्र महाराष्ट्रातील शिक्षण चालू ठेवण्यासाठी तात्काळ रद्द करावे अशी आग्रही मागणी केली आहे.तसे न केल्यास शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना एकत्र घेऊन तीव्र आंदोलन केले जाईल असे मुख्याध्यापक संघाच्या वतीने अध्यक्ष श्री वामन तर्फे व सचिव श्री गुरुदास कुसगांवकर यांनी स्पष्ट केले आहे.सदर पत्राची दखल तात्काळ घेऊन मुख्यमंत्री कार्यालयाने संबंधितांकडे कार्यवाहीसाठी पाठवले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + ten =